तसं पन्हाळगडावर आजपर्यंत बऱ्याचदा गेलो. पण आजचा पन्हाळगड काही वेगळाच अनुभवायला मिळाला. गडावर सहज फिरत फिरत सज्जाकोठी म्हणून जो पाॅईंट आहे तिथे गेलो, तर समोर हा तरुण उभा. आपल्याच धुंदीत त्याच्या त्या दुर्बीणीतून टेहळणी करत निवांत उभा. त्याची ती भली मोठी दुर्बिण बघीतली आणि मी त्याला जवळ जाऊन म्हंटलं मला यातून दाखवाल का.. “हो, तीन पाॅईंट दाखवणार १० रुपये होती” …
दुर्बिण