
छत्रपती राणी इंदुमती देवी बेघर संघटना हुपरी बेमुदत ठिय्या आंदोलन:
गट नंबर 925 / 8 अ 1 ही सरकारी हक्कातील जमीन मोजणीसाठी नगरपरिषद हलगर्जीपणा व टाळाटाळ करत असल्याचे यांच्या निषेधार्थ हुपरी छत्रपती राणी इंदुमती देवी बेघर संघटना हुपरी गेली सात वर्षे झाले गट नंबर 925/ 8 अ 1 या जमिनीवर बेघरांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल बांधून मिळावे यासाठी संघटनेचे अध्यक्ष विद्याधर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी आंदोलन केलेले आहे. आज हुपरी येथे जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार मोजणी करावी या मागणीसाठी हुपरी नगर परिषद च्या समोर आज ठिय्या आंदोलन केले होते. हुपरी नगर परिषद ने मोजणी भूमापन कार्यालय पत्र दिलेले आहे जुलै 2022 रोजी संघटनेचे मोजणी करण्याचे आश्वासन दिले आहे मोजणी नाही झाली तर. 25 जुलै 2012 रोजी संघटनेचे पदाधिकारी , हुपरी नगरपरिषद नगरसेवक व प्रशासकीय अधिकारी आढावा बैठक घेण्यात येईल. भूमापन कार्यालयाकडे पाठपुरावा करून मोजणी करून घेऊ या हुपरी नगर परिषद मार्फत असे लेखी पत्र दिल्यानंतर आज ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष विद्याधर कांबळे , भाजपचे पक्षप्रतोद रफिक मुल्ला , ताराराणी आघाडीचे पक्ष प्रतोद सुरज बेडगे, माजी उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, एपीआय पंकज गिरी, बांधकाम अभियंता जावेद मुल्ला, मिरासो शिंगे, प्रकाश बावचे,दिनकर कांबळे, सतीश कंगणे, हिरालाल कांबळे, दिलीप शिंगाडे, उदय कंगणे शशीकांत मधाळे अशोक बरगे, अरिहंत बल्लोळे, शाहू मेत्रे,जयश्री आवळे, कविता साळोखे, बेघर संघटनेचे पदाधिकारी व महिला नागरिक उपस्थित होते.