शिरोळ : प्रतिनिधी चिपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपिका नितीन परीट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच सौ. निर्मला कोळी यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागी ही निवड करण्यात आली. चिपरी ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच दिपिका परीट यांच्या रुपाने परीट समाजाला संधी मिळाली आहे. चिपरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार सकाळी मंडल अधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित …