Home Uncategorized गोकुळ शॉपिंच्या माध्यमातून गोकुळच्या उत्‍पादनांचाअस्‍वाद ग्रामीण भागातील ग्राहकांना ही घेता येईल. -आमदार ऋतुराज पाटील

गोकुळ शॉपिंच्या माध्यमातून गोकुळच्या उत्‍पादनांचाअस्‍वाद ग्रामीण भागातील ग्राहकांना ही घेता येईल. -आमदार ऋतुराज पाटील

6 second read
0
0
169

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्‍या वतीने सांगवडे ता.करवीर,जि.कोल्हापूर येथे दि.२४/१०/२०२३ इ.रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर गोकुळ शॉपीचे उद्घाटन आमदार ऋतुराज संजय पाटील यांचे हस्ते संपन्न झाले . या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे,संचालक बाबासाहेब चौगले व शॉपी धारक रामगोंडा पाटील, दादा पाटील तसेंच ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले कि, गोकुळने नेहमीच उत्पादकांच्या बरोबरीने ग्राहकांचे ही हित जोपासले असून . ग्राहकांना दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थ गोकुळ शॉपिंच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत.दिवसेंदिवस गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थांना ग्रामीण व शहरी भागातून मोठया प्रमाणात मागणी असून गोकुळ शॉपिंच्या माध्यमातून गोकुळच्या उत्‍पादनांचा अस्‍वाद ग्रामीण भागातील ग्राहकांना ही घेता येईल,असे मनोगत व्यक्त केले.

      याप्रसंगी बोलताना गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि गुणवत्ता आणि नैसर्गिक चव असणारे गोकुळ दूध, श्रीखंड, आंबाश्रीखंड, तूप, पनीर, बटर, दही, ताक, लस्सी, दूध पावडर, बासुंदी, फ्लेवर्ड मिल्क व्हॅनिला,पिस्ता,चॉकलेट व स्ट्रॉबेरी तसेच टेट्रा पॅकिंगमध्ये व्हॅनिला व मँगो लस्सी, मसाला ताक इत्यादी दूग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध ठेवले जाणार आहेत. निश्चीतच गोकुळच्या दुध व दुग्धजन्य पदार्थ याची चव आवडेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित आमदार ऋतुराज पाटील, गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, संघाचे मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे, उल्हास पाटील, शॉपीचे मालक रामगोंडा पाटील व दादा पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…