Home Uncategorized ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

6 second read
0
0
10

ईद-ए-मिलादनिमित्त आगा परिवार व समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने पन्हाळगडावर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. कुरआन पठण, हजरत पीर शहाबुद्दीन खतालवली दर्ग्यावर जियारत, लहान मुलांची तकरीर स्पर्धा तसेच आरोग्य व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांचे ज्येष्ठ नागरिकांसह नागरिकांनी कौतुक केले.
यावेळी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी मानवता, प्रेम, बंधुता, दानधर्म आणि आदर्श जीवनमूल्यांचा संदेश दिला. मुस्लिम समाजाने शिक्षणासह सर्व क्षेत्रांत प्रगती करावी, तसेच पन्हाळगडावरील हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
तकरीर स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली, तर सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन प्रोत्साहन देण्यात आले. एशियन हॉस्पिटल व आकाशदीप नेत्रालय यांच्या विद्यमाने आयोजित आरोग्य व नेत्रतपासणी शिबिराचा १०५ नागरिकांनी लाभ घेतला. मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल अफरोज मोकाशी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास नगराध्यक्ष जयश्री पोवार, उपनगराध्यक्ष सतीश भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रहीम सनदी, नगरसेवक शहाबाज मुजावर, नगरसेविका समीना गारदी, शबाना मुल्ला, माजी नगरसेवक अख्तर मुल्ला, अशपाक गारदी यांच्यासह हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आबिद मोकाशी यांनी केले. सायंकाळी कव्वाली कार्यक्रमाने सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसीम आगा, वाजीद आगा, आयाज आगा, रशीद नायकवडी, इंन्तखाब आगा, राजू आगा व समीर आगा यांनी परिश्रम घेतले.

पन्हाळा प्रतिनिधी – सचिन वरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास कोणीही थांबवू शकणार नाही. बाजार समितीच्या सर्वा…