Home Uncategorized शिरोळ येथे श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने महाआरोग्य शिबीर संपन्न३ हजार रुग्णांची केली मोफत तपासणी

शिरोळ येथे श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने महाआरोग्य शिबीर संपन्न३ हजार रुग्णांची केली मोफत तपासणी

4 second read
0
0
200

श्री दत्त साखर कारखाना शिरोळ व के.एल.ई.एस.सोसायटी बेळगाव, डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल,
जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेज आणि श्री दत्त आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २८ रोजी कारखाना कार्यस्थळावरील श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये महाआरोग्य तपासणी शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबीराचे उद्घाटन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.


याप्रसंगी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले, शेतीच्या आरोग्यासोबतच मानवी आरोग्यसुध्दा जपणे ही आता नितांत गरज झाली आहे. तालुक्यातील सर्व नागरीकांना आरोग्याची काळजी घेता यावी, तसेच नियमित तपासण्या आणि वेळेवर निदान होणे गरजेचे असल्याने या महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करणेत आल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वसामान्य नागरीकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा व सरकारी योजनांमधील सवलतीसुध्दा मिळाव्यात याकरीता शिबीराच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित तालुक्याचे तहसिलदार अनिलकुमार हेळकर बोलताना म्हणाले पूर्वीच्या पारंपारीक पध्दती आता बदलल्या असून माणसाच्या जीवनशैलीत पडलेल्या फरकामुळे आरोग्य बिघडत चालले आहे. तरी अशा तपासणी शिबीरामुळे रोगनिदान लवकर झाल्याने सर्वसामान्य नागरीकांना नंतरचे मोठे आर्थिक नियोजन करावे लागत नाही.


तालुका आरोग्य अधिकारी पांडूरंग खटावकर म्हणाले कीं, रुग्णांसाठी शासनाच्या विविध योजना असून गरजू नागरीकांनी या सर्व योजनांचा लाभ घेऊन आपले आरोग्य जपावे. सदर शिबीरामध्ये हृदयरोग, मेंदूरोग, नाक-कान-घसा, दंतरोग, फिजीओथेरपी, जनरल मेडिसीन, स्त्रीरोग, लहानमुलांचे आजार, युरोलॉजी, हाडांचे विकार, त्वचाविकार यावर सुमारे ३००० रुग्णांची मोफत तपासणी करुन मोफत औषधोपचार करण्यात आले. तसेच कांही रुग्णांना पुढील उपचारासाठी जरुर तो सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सदर शिबीरासाठी के.एल.ई.एस.चे डॉ.अल्लमप्रभू कुडची, डॉ. रमेश के.यांचेसहीत त्यांचे ५० तज्ञ सहकारी डॉक्टर्स उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…