
शिरोळ : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरसिंह अशोकराव कांबळे यांची इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेसच्या निरीक्षकपदी निवड झाली. त्यांना निवडीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. अमरसिंह कांबळे यांनी पक्षात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नितीन बागे, वासीम जमादार, जयदीप थोरात,रणजितसिंह पाटील,गुरुप्रसाद धनवडे, विठ्ठल पाटील,दत्तचे संचालक शेखर पाटील यासह शिरोळ तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान बोलताना, अमरसिंह कांबळे म्हणाले की, माझ्यावर विश्वास दाखवून काँग्रेस पक्षाने जी जबाबदारी दिली आहे, ती पार पाडण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करेन. तसेच जिल्हा कार्याध्यक्ष नितीन बागे यांच्या सहकार्याने जिल्ह्यात युवकांची मोठी फळी निर्माण केली जाणार असून पक्षाच्या विस्तारासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.


