Home Uncategorized खिंडी व्हरवडे ग्रामपंचायती च्या सरपंच पदी निवेदिता गुरव!

खिंडी व्हरवडे ग्रामपंचायती च्या सरपंच पदी निवेदिता गुरव!

2 second read
0
0
117

राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे ग्रामपंचायती च्या सरपंचपदी सौ निवेदिता निवृत्ती गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी महसूलचे मंडळ अधिकारी प्रवीण पाटील हे होते .
सौ.गुरव या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजाराम पाटील गटाच्या समर्थक असून अध्यापक निवृत्ती गुरव यांच्या पत्नी आहेत.
या निवडी प्रसंगी डॉ. बाजीराव खांडेकर, भोगावतीचे संचालक जयवंत कांबळे, रामभाऊ पाटील,एस के पाटील यांची भाषणे झाली.
यावेळी सत्तारूढ आघाडीची नेते राजाराम पाटील, शिवाजीराव पारखे, चंद्रकांत तोरस्कर,राजकुमार पाटील,एच पी पाटील, संभाजी शेटके,डी एम पाटील, अशोक सावंत, मारुती जाधव आदीसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका जयश्री चौगले उपस्थित होते.
स्वागत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी केले तर आभार उपसरपंच शशिकांत गुरव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…