कोल्हापूर, ता.१५: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) वतीने आज ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे संघाचे चेअरमन नविद हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहन करणेत आले. यावेळी संचालक किसन चौगले, प्रकाश पाटील, चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले आदी उपस्थित होते. यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, …