Home Uncategorized जिल्हयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल बेघरांच्या घरांच्या प्रश्नासाठी लवकरच शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटू : डॉ स्वाती पाटील.

जिल्हयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल बेघरांच्या घरांच्या प्रश्नासाठी लवकरच शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटू : डॉ स्वाती पाटील.

4 second read
0
0
105

विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय तसेच इतर सर्व घटकातील ज्या कुटुंबाकडे पक्के घर नाही व घर बांधण्यासाठी स्वमालकीची जागा नाही अशा गरजु कुटूंबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी संघटनेचे अध्यक्ष भिमराव साठे व शिष्टमंडळांसह लवकरच मुख्यमंत्र्याना भेटून हा प्रश्न सोडवणार असलेचे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचीव डॉ.स्वाती दिपक पाटील यांनी केले. भटका समाज मुक्ती आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वाठार- वडगांव रोडवरील इरा हॉलमध्ये संपन्न झालेल्या परिवर्तन संकल्प मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून डॉ पाटील बोलत होत्या.
स्वागत इयत्ता तीसरीतील शालेय विद्यार्थी हार्दिक प्रदीप लोंढे यांने केले तर प्रस्ताविकातुन सिनेकलाकार रमेश डोंगरे यांनी संघटनेच्या संघर्षातून केलेल्या यशस्वी कार्याचा आढावा घेतला.
डॉ स्वाती पाटील पुढे म्हणाल्या,’ तळागाळातील शेवटच्या माणसाला हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी अविरतपणे संघर्ष करत असलेल्या भिमरावबापु यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक करत यापुढे गोरगरीबांचे प्रश्न सोडवणेसाठी मी आपले संघटनेसोबत कटीबध्द राहणार,असे त्या शेवटी बोलताना म्हणाल्या.
माणुस जगला पाहिजे यासाठी येणाऱ्या काळात झोपडीमुक्ती व कर्जमुक्ती लढा उभा करणार असल्याचा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला.
भिमराव साठे म्हणाले,’ गेल्या १५ वर्षापासुन अनेक आंदोलने केली, परंतु प्रशासनावर विश्वास ठेवून होतो म्हणुनच आजतगायत पेठ वडगाव येथील ४१३ घरांच्या गृह प्रकल्पासाठी,टोप व पारगाव येथील ६० घरांच्या वसाहतींसाठी एकुण ७ एकर जमीन मंजुर करून आणली आहे.संबंधित विभागानी त्यावरती घरे बांधणेची आहेत.यासाठी व जिल्ह्यातील हजारो बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहणार असल्याचा भिमराव साठे यांनी निर्धार केला.
यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, सामाजीक कार्यकर्ते विजय चौगुले,विकास कांबळे,संजय वाघमोडे, डॉ.अभय यादव, हर्षवर्धन चव्हाण,संदीप जाधव यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी वैभव हिरवे, जयसिंग पाटील,संजय धोंगडे, प्रदीप लोंढे,सुरेश महापुरे,बेबीताई गोसावी, शामराव जाधव,रेणुका माळवे,संजय चव्हाण, पाकीजा मस्तान,रेखा गोसावी, अनिल शिंदे, दिपाली घोरपडे,रूपाली महाडीक,हेमा दबडे, कमल वायदंडे,पुष्पा मोरे,निवास पवार, रिझवाना शेख,नंदा झुंजार,विश्वजीत साठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. सुत्रसंचलन संदीप देवकुळे यांनी केले तर शेवटी आभार अभिजीत साठे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…