कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघातील लाटवडे भेंडवडे कुंभोज वठार खोची, हिंगणगाव परिसरातील नदीला टाकलेल्या भरावामुळे तसेच रस्ता करत असताना शासनाने टाकलेल्या भरावामुळे पाऊस काळात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हजार एकर शेती आज पाण्याखाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून सदर नुकसानीचे व शेतकऱ्यांचा शेतीचे पंचनामे शासनाने तात्काळ करून सदर भरावाचे योग्य नियोजन करावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी हातकणंगले नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांच्याकडे केली .यावेळी त्यांच्या समवेत लाटवडे भेंडवडे खोची कुंभोज वठार दुर्गेवाडी मिनचे परिसरातील शेतकरी वर्ग तसेच मिनचे सरपंच सविता वाक्षे लाटवडे सरपंच रंजीत पाटील शिंगणगाव सरपंच दीपक पाटील मदन अनुसे भरत नाईक उदयसिंह माने महावीर कांबळे प्रमोद सूर्यवंशी शंकर कोळी बाहुबली मगदूम कैलास चव्हाण सुशांत कुंभार दीपक कोळी शितल हेडले संजय आडके प्रकाश पाटील अभयकुमार पाटील संतोष भोकरे सचिन पुजारी हनुमंत मिसाळ आदित्य गायकवाड लखन कोळी अथर्व शिर्के अजित शिंदे वाले तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
केके न्यूज हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे



