Home Uncategorized वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला ‘इन्व्हेस्ट इन कोल्हापूर’चा मंत्र

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला ‘इन्व्हेस्ट इन कोल्हापूर’चा मंत्र

4 second read
0
0
92

कोल्हापूर –
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अंतर्गत ‘सह्याद्री सिनर्जी : द डेक्कन डायलॉग’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग नोंदवला.

या प्रसंगी त्यांनी ‘इन्व्हेस्ट इन कोल्हापूर’ या संकल्पनेद्वारे वेस्ट इंडियातील प्रमुख पाहुण्यांसमोर कोल्हापूरच्या विकासदृष्टीची मांडणी केली. नुकत्याच स्थापन झालेल्या सर्किट बेंचमुळे कोल्हापूरची विश्वासार्हता अधिक वाढली असून, भविष्यातील गुंतवणुकीसाठी कोल्हापूर हे सक्षम केंद्र ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे इंडिया हेड पुरुषोत्तम कौशिक देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले.

प्रकाश आबिटकर म्हणाले, “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारख्या व्यासपीठातून कोल्हापूरसाठी नवीन गुंतवणुकीचे दार खुले होईल. कृषी, शिक्षण, आरोग्य व औद्योगिक, तंत्रज्ञान क्षेत्रात अपार संधी कोल्हापूरकडे आहे. भविष्यातील गुंतवणूकदारांना आम्ही या माध्यमातून आमंत्रित करतो.”

या परिषदेमुळे कोल्हापूरला मोठी भविष्यातील संधी उपलब्ध होणार असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरची ओळख अधिक ठळकपणे निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी,श्रीमती मूर्चना रॉय चौधरी कम्युनिटी मॅनेजर(दक्षिण आशिया) – वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम , श्री. निशांक शाह -कम्युनिटी चॅम्पियन (पश्चिम भारत),किरण देशपांडे,गौरव घेवडे,निलेश धनके,शुभम खराडे यांच्या सह सहा राज्यांतील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…