मलकापूर प्रतिनिधी उकोली ता. शाहूवाडी या ठिकाणी सुतार गल्लीतील विजखांबाची अत्यंत दुरावस्था झाली. कोणत्याही क्षणी तो ढासळून जिवीत हानी होवू शकते. सबंधीत अधिकारी व कर्मचारी यांना सुतार वस्तीतील नागरिकांनी वारंवार निवेदन देवून, तोंडी सूचना करूनही बेजबाबदार संबंधीत प्रशासनाने मानवी जिवीताशी निगडीत असणा-या या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. अतिशय जिर्ण झालेल्या विद्युत खांबामुळे सुतार वस्तीतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण …
मौजे उकोली येथे जिर्ण झालेला विजखांब तात्काळ बदलावा