
भाजप सरकारच्या जनविरोधी कारभाराबद्दल आक्रोश व्यक्त करत हजारो जनसमुदायाच्या सहभागातून राधानगरी येथून जनसंवाद यात्रा सुरू झाली.या यात्रेत छत्रपती शाहू महाराज,महात्मा गांधींची वेशभूषा केलेल्या नागरिकांनी लक्ष वेधून घेतलं होतं.हजारो लोकांच्या सहभागाने सुरु झालेल्या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राधानगरी धरणस्थळावरील छत्रपती शाहू महाराज स्मारकास अभिवादन करून राधानगरी तालुक्यातील जनसंवाद यात्रेला सुरवात झाली.फेजीवडे,राधानगरी,सोन्याची शिरोली,कुडुत्री, गुडाळवाडी,कसबा तारळे या गावांमधून पदयात्रा काढण्यात आली.गावगावांच्या वेशीवर महिलांनी औक्षण करत फुलांचा वर्षाव करत तर तरुणांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात पदयात्रेचं स्वागत केलं.या दरम्यान शेतकरी ,शेतमजूर,कामगारांनी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरनांमुळे होणारी होरपळ आमदार सतेज पाटील,आमदार पी एन पाटील यांच्यासमोर मांडली.आमचे नेते राहुल गांधी यांनी छत्तीसशे किलोमीटर पायी चालत जनतेशी संवाद साधला,काँग्रेस पक्षाने देश विकासाच्या टप्यावर आणला होता.अनेक शासकीय कंपन्या स्थापन केल्या ,सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणलं,भाजपने काँग्रेसने स्थापन केलेल्या शासकीय कंपन्या विकून देशाला अप्रगतीच्या वळणावर आणून ठेवला असल्याचं आमदार पी एन पाटील यांनी सांगितलं.आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस पक्ष हा लोकांचा विश्वास असणारा पक्ष आहे.सामान्य माणसांच्या अडचणी काय आहेत त्या समजून घेण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे.गेली नऊ वर्षे भाजपचे राज्य हे शेतकरी विरोधी ,महिला विरोधी राज्य आहे हे निश्चितपणे सिद्ध झालेलं आहे.भाजप द्वेषाच्या राजकारणाचे बीज पेरत आहे.

महागाई वाढलीय,बेकारी वाढलीय याकडे भाजपचे दुर्लक्ष असल्याचं सांगितलं.आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार पी एन पाटील, कोल्हापुर जिल्हा कॉग्रेस महिला अध्यक्षा सुप्रिया साळोखे, तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले, गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक ए डी पाटील,राजाराम साखर कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळोखे, गोकुळचे संचालक आर.के.मोरे,बाळासाहेब खाडे, कॉग्रेसचे निरीक्षक मधुकर रामाणे, भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील ,माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मोहन धुंदरे, गोकुळचे माजी संचालक पी.डी.धुंदरे, जिल्हा बॅकेचे माजी चेअरमन कृष्णराव किरूळकर,कॉग्रेसचे समन्वयक सुशिल पाटील, राधानगरी तालुका महिला अध्यक्षा मेघा धनवडे,जिल्हा युवा उपाध्यक्ष वैभव तहसिलदार ,राज्य बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब सरनाईक, राधानगरी तालुक्यातील हजारो काँग्रेसप्रेमी जनता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
कोल्हापुरी कारभारासाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे


