अनेक वर्षे प्रलंबित असलेले मराठा समाजाचे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या काळात मार्गी लावले आहेत. आता उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांचा लाभ, मराठा समाजातील हजारो विद्यार्थी आणि तरुणांना झाला आहे, असे भारतीय जनता पार्टीचे राज्य सभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सध्याचे सरकार प्रयत्नशिल असल्याचे खासदार महाडिक म्हणाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठा निधी दिला गेला. या महामंडळाकडून आजवर सुमारे ५ हजार कोटींचे कर्ज वाटप झाले असून, त्याचा ६७ हजार तरूणांना फायदा झाला आहे. भाजपा सरकारच्या काळात आणि श्री फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना सुरू झाली. त्याचा फायदा ५८ हजारांपेक्षा अधिक मराठा विद्यार्थांना झाला आहे. २०२२ पर्यंत या योजनेत ५०० कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. मराठा समाजातील तरूणांना कौशल्य विकासासाठी, तसेच स्पर्धा परिक्षांच्या मार्गदर्शनासाठी सहाय्य करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली. सारथी संस्थेमार्फत आतापर्यंत सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांना, ४४. ५८ कोटी रुपये खर्च करून, स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण देण्यात आले. रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवून, २७ हजार ३४७ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. एमफील व पीएचडीसाठी २१०९ विद्यार्थ्यांना लाभ दिला आहे. सरकारतर्फे प्रति विद्यार्थी २० लाख रुपये पाच वर्षांसाठी फेलोशीप म्हणून अनुदान दिले जाते. तर युपीएससीच्या तयारीसाठी मराठा समाजातील ५०० मुलांना, दरवर्षी दिल्ली आणि पुणे येथे प्रशिक्षण देण्यात येते. युपीएससीत ५१ उमेदवार, तर वर्ग १ आणि वर्ग २ अशा एकूण ३०४ मराठा समाजातील विद्यार्थ्यांची, एमपीएससीमार्फत निवड झाली आहे, असेही खासदार महाडिक यांनी सांगीतले. ठाकरे- पवार सरकारच्या काळात सारथीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे, छत्रपती संभाजी राजे यांना उपोषण करावे लागले होते, याची आठवणही खासदार महाडिक यांनी करून दिली. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे शैक्षणिक सवलती, सुविधा दिल्या जातात. ९ वी ते ११ वीतील विद्यार्थ्यासाठी, छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली असून, आतापर्यंत २३ हजार २२४ विद्यार्थ्यांना ३१.२३ कोटी रुपये देण्यात आले आहेत, याकडे खासदार धनंजय महाडिक यांनी लक्ष वेधले
Home Uncategorized देवेंद्र फडणवीस यांनीच दिले आरक्षण, फडणवीस यांच्या निर्णयांचा मराठा समाजातील हजारो विद्यार्थी आणि तरुणांना झाला फायदा, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती
Check Also
चिपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपिका परीट यांची बिनविरोध निवड
शिरोळ : प्रतिनिधी चिपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपिका नितीन परीट यांची बिनविरोध निवड कर…