मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी आज भेट घेतली. यावेळी भाऊबीज सणानिमित्त त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, या उद्देशाने आमदार सत्यजित देशमुख यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत हा निधी दिला.


