Home Uncategorized राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी अभिषेक डोंगळे यांची नियुक्ती..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी अभिषेक डोंगळे यांची नियुक्ती..

3 second read
0
0
194

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी आज अभिषेक अरुण डोंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.. राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या कडून डोंगळे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

अभिषेक डोंगळे यांनी राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी काम करत असताना पक्ष संघटना पातळीवर केलेली निरनिराळी कामे केली. त्यांची काम करण्याची पद्धत, तसेच युवकांचे आणि स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवून त्यांच्यापर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवण्याचे काम डोंगळे यांनी अतिशय कार्यतत्परतेने केले.. त्यांनी केलेल्या या कामाची दखल घेऊन स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी त्यांची निवड करण्यात आली… आगामी काळात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारानुसार पक्ष बांधणी मजबुतीकरण करण्यासाठी अभिषेक डोंगळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे…

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाची आढावा बैठक मुंबई येथे राष्ट्रवादी कार्यालयात पार पडली. यावेळी युवक काँग्रेस प्रदेशची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…