Home Uncategorized महसूल विभागाची शिक्षकांप्रती कृतज्ञता

महसूल विभागाची शिक्षकांप्रती कृतज्ञता

3 second read
0
0
46

आंबा:

शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी पुढाकार घेवून तालूक्यातील गुणवंत व दूर्गम भागातील उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करुन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार होत शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन गौरविले. श्री चव्हाण म्हणाले, निवडणूक आयोगाअंतर्गत मतदार नोंदणी, मतदार यादी दूरूस्ती, निवडणूक प्रक्रिया यामध्ये शिक्षकांचे सर्वाधिक योगदान असते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आमची बांधिलकी आहे. यावेळी नायब तहसीलदार रवींद्र मोरे,शिक्षण विस्तार अधिकारी आनंदा सुतार आदी प्रमुख उपस्थित होते.सदाशिव थोरात, गणेश लवे, अशोक पाटील, साहेब शेख, सदाशिव कांबळे, रोहिणी विभुते,मोहन कांबळे, प्रकाश कोकाटे, शोभाताई पाटील यांनी मनोगते मांडली. तलाठी मोहिते यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…