कुंभोज येथील ऊस तोडी दरम्यान येथील गणबावले व श्री. धनपाल माने यांच्या ऊसशेतीमध्ये ऊसतोडणी सुरू असताना ही पिल्ले ऊस तोडी कामगारांच्या निदर्शनास आली. अचानक पिल्ले आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले बिबट्याची पिल्ले असल्याचे चर्चा सुरू होती याची माहिती हातकलंगले येथील वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
वनक्षेत्रपाल करवीर नंदकुमार नलवडे आणि वनपाल हातकणंगले कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक हातकणंगले मंगेश वंजारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली दरम्यान हे पिल्ली रान मांजराची असल्याचे सांगण्यात आले
यावेळी पिल्लांना सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली. तसेच त्यांना त्यांच्या आईपासून वेगळे न ठेवता आईशी पुन्हा भेट घडवून आणण्यासाठी वनविभागाने प्रयत्न केले.
ऊसशेतीमध्ये अनेकदा वन्यप्राणी आपला अधिवास करतात. ऊसतोडणीच्या काळात अशा घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकरी आणि ऊसतोडणी कामगारांनी शेतात वन्यप्राण्यांची पिल्ले आढळल्यास घाबरून न जाता त्यांना हात लावू नये किंवा त्रास देऊ नये. याबाबत तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
Kk न्यूज हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे



