मलकापूर प्रतिनिधी
मागासवर्गीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक, अमानवीय लैगिंक अत्याचार करणाऱ्या करंजोशी, ता. शाहूवाडी येथील राजर्षि शाहू करियर अॅकेडमी अध्यक्ष संजय बळीराम लोकरे मु.पो. अंबार्डे या लिंगपिसाट नराधमाचा जाहीर निषेध. सदरची घटना अतिशय निंदनीय व मानवतेला काळीमा फासणारी असुन गुरू-शिष्याच्या नात्याला कलंक लावणारी आहे.
सदरच्या अॅकॅडमीमध्ये सर्वसामान्य वर्गातील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थीनी हजारो रुपये खर्च करून पोलिस व सैन्यभरतीचे प्रशिक्षण घेत आहेत. संबंधित नराधम अॅकेडमी चालकाच्या गैरकृत्याला आणखीन किती अल्पवयीन विद्यार्थी बळी पडले आहेत याची पोलिस प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी करावी. सदरची घटना अतिशय घृणास्पद असून विद्यार्थ्यांच्या बालमनावर गंभीर परिणाम करणारी आहे. संबंधित लिंगपिसाट नराधमास कठोर शिक्षा व्हावी अशा उच्च पातळीचा तपास पोलिस प्रशासनाने करून संबंधित अल्पवयीन पिडीत विद्यार्थ्याला न्याय द्यावा असे निवेदन भारतीय दलित महासंघ तर्फे शाहूवाडी पोलीस यांना देण्यात आले. यावेळी उपस्थित शाहुवाडी तालुका अध्यक्ष आकाश कांबळे (ओकोलीकर), दयानंद कांबळे,मानसिंग आडके,सिद्धार्थ बनसोडे,संजय बनसोडे,अनिरुद्ध कांबळे,विजय लोखंडे,नाना लोखंडे हे उपस्थित होते.
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते