मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील सरूड येथे भटक्या-विमुक्त जाती-जमातीतील पात्र नागरिकांना जातीचे व उत्पन्नाचे दाखले श्रावण बाळ या योजनेचे वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळविणे नागरिकांना सुलभ झाले आहे.या अभियानांतर्गत सरूड येथे आयोजित कार्यक्रमास शाहूवाडीच्या तहसीलदार शुभांगी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सरूड मंडलाधिकारी विकास …
सरूड येथे सेवा संकल्प अभियान संपन्न