Home Uncategorized हातकणंगले, शिरोळसह ५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा – खासदार धैर्यशील माने

हातकणंगले, शिरोळसह ५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा – खासदार धैर्यशील माने

4 second read
0
0
49

खरीप हंगामातील पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांची वाढ खुंटून अनेक ठिकाणी पिके वाळली आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा व वाळवा या पाच तालुक्यांचा ‘ट्रिगर-१’ (प्रथम कळ) लागू झालेल्या तालुक्यांमध्ये समावेश करून दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना विविध सवलती व उपाययोजना लागू कराव्यात, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे की ,मदत व पुनर्वसन विभागाने दि.२५ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयात ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी, शिराळा व वाळवा या तालुक्यांचा त्यात समावेश झालेला नाही. या भागातील पावसाची स्थिती आणि पिकांची झालेली हानी लक्षात घेता शासनाने याबाबत फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. त्याचबरोबर पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तसेच पावसामध्ये मोठे खंड पडल्याने खरीप पिकांना फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या पाचही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करून सुधारित शासन निर्णय काढावा. तसेच दुष्काळी परिस्थितीत लागू होणाऱ्या विविध सवलती व उपाययोजना संबंधित शेतकऱ्यांना मिळाव्यात, यासाठी संबंधित यंत्रणांना तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू जयसिंगपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, कोल…