Home Uncategorized म्हाळसवडे येथील चिखल गुट्टा शर्यतीत सोनुर्ली- कोल्हापूर च्या अमोल कोरे यांची बैलजोडी प्रथम आरूळच्या धोंडिबा केशव पाटील यांच रेडाजोडी प्रथम व गावपातळीवर नारायण खोत बैलजोडी प्रथम

म्हाळसवडे येथील चिखल गुट्टा शर्यतीत सोनुर्ली- कोल्हापूर च्या अमोल कोरे यांची बैलजोडी प्रथम आरूळच्या धोंडिबा केशव पाटील यांच रेडाजोडी प्रथम व गावपातळीवर नारायण खोत बैलजोडी प्रथम

4 second read
0
0
11

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते:

म्हाळसवडे (ता. शाहुवाडी )येथील एस के कॅटरर्स चे मालक सर्जेराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखल गुट्टा शर्यती चे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोल्हापूर येथील सोनुर्ली गावच्या अमोल कोरे यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला व आरूळ च्या धोंडीबा पाटील यांच्या रेडा जोडीने गावपाळीवर पाटेवाडीच्या नारायण खोत यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावून रोख रक्कम व मानाची ढाल बक्षिस देऊन गौरविण्यात आले एस के कॅटरर्स च्या वतीने म्हाळसवडे यांच्या वतीने सर्जेराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखल गुट्टा मैदानाचे उदघाटन जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते पार पाडले. यावेळी कोकण लांजा, भांबेड, कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र पंचक्रोशी तील १८ बैल जोडी व १२ रेडा जोडीने सहभाग घेतला होता या चिखल गुट्टा शर्यतीमध्ये पहिल्या पाच क्रमांकाना व गाव स्वरूपीं रोख रक्कम व मानाचा ढाल बक्षिस देऊन गौरव करण्यात आला.

बैल जोडी – प्रथम क्रमांक कोल्हापूर-सोनुर्ली येथील अमोल कोरे यांच्या बैल जोडीने पटकावला,द्वितीय क्रमांक परळे येथील विष्णू पाटील, तृतीय क्रमांक पाल च्या प्रविण पाटील, चुतर्थ क्रमांक कासार्डेच्या विनायक जंगम, पाचवा क्रमांक सागाव जाधववाडी च्या राजाराम पाटील यांच्या बैल जोडीने पटकावला या सर्वांना रोख रक्कम व मानाची ढाल बक्षिस देऊन गौरविण्यात आले रेडा जोडी मध्ये प्रथम क्रमांक आरूच्या धोंडीबा केशव पाटील, द्वितीय क्रमांक शिराळाच्या अक्षय पाटील, तृतीय क्रमांक बर्की च्या भिकाजी पाटील, चुतर्थ क्रमांक आंबर्डे च्या डोंजाई जोर्तिर्लिंग प्रसन्न, पाचवा क्रमांक येलूर- जाधववाडी च्या रोहन खाडे या सर्व रेडा जोडीना रोख रक्कम व मानाची ढाल बक्षिस देऊन गौरविण्यात आले गावपातळीवर प्रथम क्रमांक पणुद्रे पैकी पाटेवाडीच्या नारायण खोत , म्हाळसवडे च्या द्वितीय क्रमांक रामू पाटील यांना रोख रक्कम व मानाची ढाल बक्षिस देऊन गौरविण्यात आल या चिखल गुट्टा शर्यतीचे धावते समालोचन दत्ता वारकरी कोपार्डेकर , घडयाळ पंच हरिश्चंद्र पाटीत, दिपक मांजरेकर यांनी पाहिलेकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्जेराव कांबळे, तुषार कांबळे, संजय बांद्रे, नारायन डोंबे, मारुती कांबळे, तानाजी कांबळे, रमेश कांबळे,लक्ष्मण कांबळे,मानसिंग काळे, प्रकाश काळे, वसंत पाटील, गणेश माळी,चैतन्य कांबळे, बापू कस्तुरे, मारुती खोत आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सरूड येथे सेवा संकल्प अभियान संपन्न

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शाहूवाडी…