Home Uncategorized संस्थांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांचे हित जपण्याचे काम कौतुकास्पद : अजय पाटील यड्रावकर

संस्थांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांचे हित जपण्याचे काम कौतुकास्पद : अजय पाटील यड्रावकर

2 second read
0
0
11

हेरवाड :
शेतकरी सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि त्यांच्या हितासाठी शेतकरी दूध व्यवसाय संस्था , हेरवाड ग्रामीण बिगर शेती पतसंस्था तसेच शेतकरी बचत मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. केवळ आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता या संस्था सामाजिक कार्यातही नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत. सहकाराच्या माध्यमातून सभासदांना आर्थिक बळ देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम या संस्थांकडून होत असल्याचे गौरवोद्गार अजय पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले.
हेरवाड येथील शेतकरी दूध व्यवसाय संस्था, हेरवाड ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि शेतकरी बचत मंडळ यांच्या वतीने आयोजित बोनस, दिवाळी भेटवस्तू आणि लाभांश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी शेतकरी दूध व्यवसाय संस्थेच्या सभासदांना बोनसचे वाटप करण्यात आले. हेरवाड ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देण्यात आल्या, तर शेतकरी बचत मंडळाच्या वतीने सभासदांना लाभांशाचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबासो पाटील असुर्लेकर, बाळासो माळी, बाबुराव माळी, वैभव पाटील, सुनील माळी यांच्यासह तिन्ही संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाचे सदस्य आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन;जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा..

कोल्हापूर, ता. ०२ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. (गोकुळ) यांच्या वतीने यावर…