आंबा: शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी पुढाकार घेवून तालूक्यातील गुणवंत व दूर्गम भागातील उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करुन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार होत शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन गौरविले. श्री चव्हाण म्हणाले, निवडणूक आयोगाअंतर्गत मतदार नोंदणी, मतदार यादी दूरूस्ती, निवडणूक प्रक्रिया यामध्ये शिक्षकांचे सर्वाधिक योगदान असते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आमची बांधिलकी आहे. यावेळी नायब …