नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी शिरटी ता. शिरोळ येथील प्रतिष्ठित नागरिक आणि यड्रावकर गटाचे गटनेते तसेच प्रकाश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन सूर्यकांत कल्लापा उदगावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर उदगावे यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. निवडीनंतर आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकरांनी त्यांचे अभिनंदन केले.
सूर्यकांत उदगावे हे गावातील विविध सहकारी संस्थेमध्ये पदाधिकारी आहेत. ते ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सर्व संचालकांना सोबत घेऊन ज्ञानदीप शिक्षण संस्थेचा कायापालट केला आहे. ते गावातील विविध धार्मिक, सामाजिक, व राजकीय कार्यक्रमात हिरीरीने सहभागी होतात. गावातील नागरिकांच्या कोणत्याही शुभकार्यात तेव्हा दुःखाच्या प्रसंगी ते तत्परतेने हजर असतात. त्यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर शिरटी परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
केके न्यूजसाठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे



