कोल्हापूर : (प्रतिनिधी अरविंद सावरतकर) कागल तालुक्यातील कुरुकली येथील ७७ नागरिकांच्या नावे भूखंड करण्याची प्रक्रिया गतीने राबवा. सोबतच कागदपत्र उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांबाबतही शासन स्तरावर लवकरात लवकर निर्णय घेता येईल यासाठी प्रस्ताव सादर करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कागल तालुक्यातील कुरुकली येथील भूखंडधारकांबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. …
कागल तालुक्यातील कुरुकलीतील भूखंड संबंधित जागा मालकांच्या नावे करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ