Home Uncategorized “माझी शाळा सुंदर शाळा” अभियानात राशिवडेचे नागेश्वर हायस्कूल राधानगरी तालुक्यात प्रथम…

“माझी शाळा सुंदर शाळा” अभियानात राशिवडेचे नागेश्वर हायस्कूल राधानगरी तालुक्यात प्रथम…

2 second read
0
0
430

राशिवडे प्रतिनिधी – कृष्णा लाड.

महाराष्ट्र राज्य शासन आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राधानगरी तालुक्यात राशिवडे बु ( ता. राधानगरी ) येथील श्री नागेश्वर हायस्कूलने माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळविला. राज्य शासनाने आयोजित केलेल्या या अभियानात प्रथम केंद्रनिहाय मूल्यांकन करण्यात आले होते.केंद्रात प्रथम आलेल्या शाळेतून तालुकास्तरीय प्रथम क्रमांक काढण्यात आला. यावेळी शाळा परिसर स्वच्छता, शाळा रंगरंगोटी, विद्यार्थी सहभाग आणि लोकसहभाग, शाळेतील विविध उपक्रम, नवसाक्षरता अभियान, परसबाग, वृक्षारोपण, अमृतवाटिका तसेच तंबाखूमुक्त क्षेत्र अशा विविध उपक्रमांचे तालुकास्तरीय समितीकडून मूल्यांकन करण्यात आले यामधून तालुक्यात सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून श्री नागेश्वर हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक एस. एल. चौगले, पर्यवेक्षक डी. बी. टिपुगडे, ए. एन. गोनुगडे, एस. एस. ढोकरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. तसेच राधानगरी गटशिक्षणाधिकारी बी. एम. कासार, विस्तार अधिकारी जांगनुरे, कडगावकर तसेच संस्था अध्यक्ष वि. ज्ञा. पाटील (गुरुजी ),उपाध्यक्ष सुभाष पाटील , सचिव किरण निल्ले, संचालक शिवाजी लाड, सुभाष पाटील, राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…