Home Uncategorized ‘गोकुळ’ मार्फत जया तथा माघी वारी एकादशी निमित्त सुगंधी दूध वाटप…

‘गोकुळ’ मार्फत जया तथा माघी वारी एकादशी निमित्त सुगंधी दूध वाटप…

6 second read
0
0
166

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या कोल्हापूर (गोकुळ) मार्फत जया तथा माघी वारी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी व भाविकांना सुगंधी दूध वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.

जया तथा माघी वारी एकादशी निमिताने श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी वारीमध्ये महाराष्ट्रातील तसेच कर्नाटक राज्यातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात. या पायी वारीचे औचित्य साधून आज वारीतील भाविकांना गोकुळच्या वतीने ५००० सुगंधी दूध पिशवी वाटप संघाचे चेअरमन मा.अरुण डोंगळे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी याचा लाभ घेतला.

या कार्यक्रमप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, प्रांताधिकारी सचिन इतापे, तहसीलदार सचिन इगुले, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, पंढरपूर येथील वितरक प्रदीप थोरात, राजेश कदम, योगेश टोणपे, सुहास डोंगळे, संदीप ढेकळे, शिवाजी चौगले, संघाचे अधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…