Home Uncategorized कोर्टा समोरील धोकादायक डिव्हायडर काढा, अन्यथा रस्ता रोको आप चा महापालिकेला इशारा…

कोर्टा समोरील धोकादायक डिव्हायडर काढा, अन्यथा रस्ता रोको आप चा महापालिकेला इशारा…

5 second read
0
0
147

कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या ऑऊट गेट समोर असणाऱ्या डिव्हायडरला धडक बसून अनेक अपघात घडत आहेत. वाहतूक नियंत्रण शाखेने डिव्हायडर काढण्यास सहा महिन्यापूर्वी मान्यता देऊन देखील महापालिकेने यावर कार्यवाही केलेली नाही.

यावर आम आदमी पार्टीने उपशहर अभियंता रमेश कांबळे यांना जाब विचारत स्पष्ट अहवाल असताना देखील कार्यवाही का केली नाही असा सवाल शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केला.यावर कांबळे यांनी डिव्हायडर काढण्यासाठी ब्रेकर लागणार असून चार दिवसात काढून घेतो असे आश्वासन दिले. चार दिवसात काम झाले नाही तर कोर्टासमोर रस्ता रोको करू असा इशारा शहर सचिव समीर लतीफ यांनी दिला.

यावेळी महासचिव अभिजित कांबळे, नाझील शेख, कुणाल रणदिवे, अमरसिंह दळवी, रमेश कोळी, मयूर भोसले, आदम शेख, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…