शिरोळ : प्रतिनिधी शिरोळच्या दत्त कारखान्याने जाहीर केलेला ३४०० रुपये दर मान्य नाही व परवडणारा दर देत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांनी ऊस तोडी घेऊ नयेत. असे आवाहन आंदोलन अंकुश संघटनेने केलेले आहे. अंकुशच्या या आव्हानाला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला दिसत आहे. तुरळक ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी तोडी घेतलेल्या आहेत, त्यांना समजावून सांगून, ऊस तोडी बंद करण्याची विनंती अंकुश संघटनेकडून करण्यात येत आहे. …
अर्जुनवाडमध्ये आंदोलन अंकुशने दत्त कारखान्याला जाणारा ऊस रोखला… विरोध करणार्या दत्तच्या संचालकांच्या विरोधात आज अर्जुनवाडमध्ये सभा…