Home Uncategorized रोटरीच्या माध्यमातून समाजातील चांगुलपणा जपण्याचा प्रयत्न : चंद्रकांत भाटशिरोळ रोटरी हेरिटेज सिटची निराधारांसोबत दिवाळी

रोटरीच्या माध्यमातून समाजातील चांगुलपणा जपण्याचा प्रयत्न : चंद्रकांत भाटशिरोळ रोटरी हेरिटेज सिटची निराधारांसोबत दिवाळी

3 second read
0
0
29


शिरोळ : प्रतिनिधी

जागतिक सामाजिक संस्था असणाऱ्या रोटरी क्लबचा सदस्य म्हणून समाजातील चांगुलपणा जपण्याचे आदर्शवत कार्य घडत आहे. याचा रोटिरियन म्हणून सार्थ अभिमान आहे. असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे सदस्य चंद्रकांत भाट यांनी केले. निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील आई वृद्धाश्रमातील निराधारांसोबत रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्या सदस्यांनी दीपावली साजरी केली.

रोटरी हेरिटेज सिटीचे अध्यक्ष प्रा के. एम. भोसले, सचिव अमित जाधव, सदस्य संजीव पुजारी,प्रा एस. एस. पाटील, चंद्रकांत भाट, माजी अध्यक्ष संजय पाटील (माऊली), तुकाराम पाटील (भैय्या), सदस्य सुरेश देशमुख, संजय रा. शिंदे, अनिकेत जोशी महाराज, यांच्यासह सदस्यांच्या सहयोगातून आई वृद्धाश्रमातील वृद्ध निराधार महिलांना साडी, वृद्धांना कपडे, दीपावलीचा फराळ, सुगंधी साबण, तेल, उठणे यासह जीवनावश्यक साहित्याची भेट देण्यात आली. याप्रसंगी चंद्रकांत भाट यांनी मनोगत व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष मेजर प्रा के. एम. भोसले बोलताना म्हणाले की रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी नेहमीच सामाजिक उपक्रमातून उपेक्षित गरजूंचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न करीत आहे. आई वृद्धाश्रमातील निराधारांची सेवा करण्यासाठी सर्व पदाधिकारी सदस्य कटिबद्ध राहतील.
आई वृद्धाश्रमाचे संस्थापक संजय भोसले म्हणाले की रोटरी परिवाराने नेहमीच आई वृद्धाश्रमाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येथील निराधार आरोग्यसंपन्न जीवन जगत आहे. रोटरी परिवाराचे सामाजिक क्षेत्रातील कार्य आदर्शवत आहे.

यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सचिव अमित जाधव,प्रा. एस. एस. पाटील, संजय रा. शिंदे, कु. सायली शिंदे, कु चैताली शिंदे यासह आश्रमातील वृद्ध निराधार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…