हुपरी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजगुरुनगर येथील जिव्हेश्वर भवनमध्ये कार्यकर्त्यांची आढावा बैठक व इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी शहराध्यक्ष अभिजीत देसाई यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पार पडली. या आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) यांनी हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान आम्ही स्वबळावरती निवडणूक लढणार आहोत व प्रत्येक वार्डामध्ये आमचा उमेदवार देऊन विजय करून त्यांना सत्तेमध्ये आणणार आहोत असे घोषित केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वेगवेगळ्या असलेल्या शासकीय योजना, बचत गट योजना, शेतकरी योजना, अशा अनेक योजना पोहोचवणार असून प्रत्येक नागरिकाच्या अडचणी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष हा खंबीरपणे उभा राहील व त्या अडचणीतून त्यांना सोडवेल असे त्यांनी सांगितले.
यावेळी शिरीष देसाई, संभाजी पवार, हर्षवर्धन चव्हाण, अभिजीत देसाई, वैशालीताई कंगणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षास बळ देण्याचे एक निश्चय करून निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले.
यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष- बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), तालुकाध्यक्ष -शिरिष देसाई, हातकणंगले विधानसभा अध्यक्ष- संभाजी पवार, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष -हर्षवर्धन चव्हाण, शहराध्यक्ष- अभिजीत देसाई, युवा तालुकाध्यक्ष- आकाश कांबळे, हुपरी महिला शहराध्यक्षा- वैशालीताई कंगणे, काळे सर,सतीश तानवडे, दिलावर तांबोळी, राजु माणकापूरे, अल्ताफ मुल्लानी, आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थितीत होते.



