Home Uncategorized शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ. दगडू माने परिवाराचे शहरासाठी योगदान….. लोकाग्रहास्तव शिरोळ नगराध्यक्ष पदासाठी सौ. संगीता माने निवडणूक रिंगणात ?

शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ. दगडू माने परिवाराचे शहरासाठी योगदान….. लोकाग्रहास्तव शिरोळ नगराध्यक्ष पदासाठी सौ. संगीता माने निवडणूक रिंगणात ?

6 second read
0
0
222

     शिरोळचे डॉ दगडू माने यांचे पिताश्री कै श्रीपती माने यांनी १९६९ मध्ये आमरण उपोषण लोकलढ्यात सहभागी होऊन शिरोळ गावाला पहिली नळ पाणी योजना मंजूर करून गावाला पिण्याचे पाणी दिले.ग्राम पंचायतीचे सदस्य ते उपसरपंच अशी त्यांनी कारकीर्द गाजवली. कै श्रीपती माने यांनी कृष्णामाई पाणी योजनेचे संस्थापक चेअरमन होते. अल्पभूधारक व मागासवर्गीय शेतकऱ्यांची शेती त्यांनी हिरवीगार केली आहे .त्यांच्या कार्याची नोंद घेऊन सभासदांनी संस्थेला कै श्रीपती माने कृष्णामाई पाणी पुरवठा संस्था असे नामकरण करण्यात आले आहे. श्री बुवाफन मंदिरनजीक श्रीराम नगर गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक तसेच यादवनगर भागातील गल्ली नंबर - १ ( ग्राहक बझार परिसर ) वसाहतीचे संस्थापक म्हणून योगदान. दीनदौलत सोसायटीचे उपसभापती म्हणून कार्यरत होते.  

डॉ.दगडू माने यांच्या मातोश्री श्रीमती फुलाबाई माने यां उत्कृष्ट गृहिणी ते आदर्श माता म्हणून परिचित आहेत.शिरोळ तालुक्यात प्रारंभीच्या काळात लोकराजा शाहू महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आर्थिक अडचणीवेळी  स्वतःचे गळ्यातील दागिने बँकेत गहाण ठेवून सांस्कृतिक चळवळीला बळ दिले होते.शेतमजुरी व बैलगाडीने ऊस वाहतूक करून काबाडकष्ट करून मुलांना घडविले .आपल्या परीने समाजातील गरीब घटकाला मदत केली आहे. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई संकपाळ यांच्याकडून श्रीमती फुलाबाई (आईसाहेब ) यांचा गौरव झाला आहे.

डॉ.दगडू माने यांनी तीन दशकाहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले. त्यांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून आचार्य प्र के अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरव झाला असून सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल यु सी इंटरनॅशनल फ्रान्स विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण /दलितमित्र पुरस्काराने डॉ दगडू माने यांच्या कार्याचा गौरव झाला आहे.

सौ संगिता दगडू माने यांनी विशेष कार्यकारी अधिकारी तसेच शिरोळ तालुका महिला काँग्रेस पक्षाच्या माजी उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम केले आहे. दुर्गा महिला मंडळ व बचत गटाच्या माध्यमातून महिला संघटन, सक्षमीकरण यावर भर देऊन त्यांनी २२ वर्ष सामाजिक कार्यात योगदान दिले आहे. त्या शिक्षित व कर्तबगार महिला म्हणून परिचित असून त्यांना लोकसेवेची आवड आहे. सौ संगीता दगडू माने व परिवाराचा थेट जनतेशी सुसंवाद असून प्रत्येकाच्या सुखा - दुःखात सहभागी होऊन प्रामाणिक व विश्वासाने या परिवाराने जनतेशी ऋणानुबंध जोडले आहेत. शिरोळ नगरपालिका नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलांसाठी प्रथमच आरक्षित झाल्याने नगराध्यक्षा पदावर  सौ संगीता दगडू माने यांना संधी मिळावी यासाठी जनतेतून वाढता पाठिंबा मिळत आहे.  सौ संगीता दगडू माने व त्यांचे समर्थक शिरोळ जनतेच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेताना दिसत आहेत.
     सौ. संगीता माने यांना आदर्श महिला, आदर्श वहिनीसाहेब व आदर्श सामाजिक कार्यकर्त्या असे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी दुर्गामाता महिला मंडळ स्थापन केले असून महिलांना संघटित करून बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण व महिला उद्योग निर्मितीसाठी प्रेरणा दिली आहे. त्याशिवाय छोटे - मोठे सांस्कृतिक कार्यक्रम घेवून सामाजिक ऐक्य , कौटुंबिक नाती दृढ करण्याबरोबरच आपल्या परीने समाजाप्रती मदत करण्याचा सेवाभाव त्यांनी जपला आहे. सौ.संगीता माने यांनी वृद्धाश्रम व सामाजिक सेवाभावी संस्था सहल भेटीतून समाजातील सुख - दुःख जाणून घेऊन चांगुलपणाची साखर पेरणी समाजात रुजावी यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. सुशिक्षित आणि सर्वसामान्य कर्तबगार महिला म्हणून सौ संगीता दगडू माने यांना मागासवर्गीय महिला नगराध्यक्षा आरक्षण निमित्ताने शिरोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी संधी मिळावी अशी मागणी शिरोळकर जनतेतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…