Home Uncategorized दीपावली शुभेच्छा निमित्ताने सौ. सारिका अरविंद माने मतदारांच्या भेटीला

दीपावली शुभेच्छा निमित्ताने सौ. सारिका अरविंद माने मतदारांच्या भेटीला

3 second read
0
0
121


शिरोळ : प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष व शिरोळचे माजी कर्तव्यदक्ष नगरसेवक डॉ. अरविंद माने आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ सारिका अरविंद माने या दीपावलीच्या शुभेच्छा देण्याकरिता थेट मतदारांच्या भेटीला जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. शिरोळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सौ सारिका अरविंद माने यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने, शिरोळ ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ. रेखादेवी माने यांनी शिरोळच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सामाजिक राजकीय कार्याचा वारसा माजी नगरसेवक डॉ.अरविंद माने सक्षमपणे पुढे नेत आहेत. यामुळे नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत डॉ माने यांना अपक्ष उमेदवार असूनही भरघोस मताने निवडून दिले होते. त्यांच्या पत्नी सौ. सारिका माने या नगराध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार मानले जात आहेत. यामुळे डॉ. अरविंद माने व सौ. सारिका माने हे दापत्य निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यापासून मतदारांची गाठीभेटी घेऊन आपली भूमिका ज मांडत आहेत.

दीपावली सणाच्या निमित्ताने त्यांनी प्रत्येक घराघरांत जाऊन दीपावलीच्या शुभेच्छा देऊन नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जनतेची साथ रहावी, नगरपालिकेच्या माध्यमातून केलेली विकास कामे आणि शिरोळच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेला विकास आराखडा या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत आहे. डॉ. अरविंद माने व सौ सारिका माने हे विविध क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना नेहमीच जनतेचे पाठबळ मिळत आहे. दीपावलीच्या शुभेच्छा निमित्ताने त्यांनी राबविलेल्या उपक्रमासही जनतेतून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…