Home Uncategorized गोंधळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबद्ध : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

गोंधळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबद्ध : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

4 second read
0
0
28

शिरोळ : कुणाल कांबळे
गोंधळी समाज हा आपल्या परंपरेतून संस्कृती, भक्ती आणि कलावैभव यांचा वारसा जपणारा समाज आहे. या समाजाने वारकरी संप्रदायात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे या समाजासाठी सांस्कृतिक हॉल उभारणे म्हणजे त्यांच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी यापुढेही निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे करणे योजनने अंतर्गत कुरुंदवाड नगरपरिषद हद्दीमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गोंधळी समाजासाठी सांस्कृतिक हॉल बांधणेसाठी मंजूर झालेल्या २५ लाख रुपये निधीतून सांस्कृतिक हॉलचा पायाभरणी शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

आमदार यड्रावकर पुढे म्हणाले की, आजचा युवक समाजाच्या प्रगतीचा केंद्रबिंदू आहे. सध्याच्या स्पर्धात्मक आणि धावत्या युगात गोंधळी समाजातील युवकांनीही उच्च शिक्षण घेऊन समाजाचा नावलौकिक वाढवावा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी. गोंधळी समाजाच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी माझे संपूर्ण सहकार्य राहील. या हॉलच्या माध्यमातून समाजातील नव्या पिढीला कला, शिक्षण आणि संस्कार यांचे केंद्र उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.

याप्रसंगी मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, रामचंद्र डांगे, रमेश भुजुगडे, दादासो पाटील, मनीषा डांगे, जय कडाळे, भिमराव यादव, दीपक गायकवाड, उदय डांगे, दिपक पोमाजे, किरण जोंग, गोंधळी समाजाचे अध्यक्ष नंदकुमार माने, उपाध्यक्ष गणपती माने, उपाध्यक्ष सचिन भिसे यांच्यासह गोधळी समाज व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…