पन्हाळा : पन्हाळा तालुका अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या सन २०२६-२०२७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सर्वानुमते करण्यात आली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी राजेंद्र विष्णू पाटील यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी माणिक नामदेव डवंग, सेक्रेटरीपदी बाबासो भुजंगा शेलार, जॉइंट सेक्रेटरीपदी सागर गोपाळ हटकर, खजिनदारपदी विनायक आर. मोरे, तर महिला प्रतिनिधी म्हणून इंदिरा प्रकाश भोसले यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून किरण महादेव पाटील, समृद्धी बाजीराव चव्हाण आणि नंदिनी कृष्णात मोरे पाटील यांची निवड करण्यात आली.
सर्व पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते झाल्याने बार असोसिएशनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या माध्यमातून वकील बांधवांच्या हितासाठी तसेच संघटनेच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांचे पन्हाळा तालुका अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



