हातकणंगले नगरपंचायतीमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करत नगरसेवक सुभाष गोरे यांनी आज ठिय्या आंदोलन केले. नगरपंचायतीची मासिक बैठक संपल्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या केबिनसमोर ठिय्या देत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नासह नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, तसेच पाणीपुरवठ्याशी संबंधित समस्यांची तातडीने सोडवणूक व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रत्यक्ष कार्यवाही करावी, या भूमिकेतून नगरसेवक सुभाष गोरे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनसमोर ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनामुळे हातकणंगले नगरपंचायतीतील पाणीपुरवठ्यासह नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासन यावर काय भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
केके न्यूज हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे



