प्रत्येक मानवी जीवन यशस्वी होण्यासाठी गुरुजनांनी केलेले मार्गदर्शन महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे समाजात गुरूंना अनन्य साधारण महत्व आहे. जो चांगल्या विचाराने मार्गदर्शकाची भूमिका निभावतो त्या सर्वांनाच गुरु मानले जाते असे प्रतिपादन शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी केले.
शिरटी (ता शिरोळ) येथे ग्रामपंचायत आणि वंदे मातरम कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी गावातील सर्व गुरुजनांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी विजयकुमार परीट बोलत होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आली. माजी सरपंच राहुल सूर्यवंशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सरपंच सौ शुभांगी शिरगावे, उपसरपंच प्रकाश माळी, माजी सरपंच प्रकाश उदगावे, प्रतिष्ठित नागरिक अशोक चौगुले (आण्णा) नालसाहेब मुल्लाणी, बादशाह शेख, उल्हास चौगुले, निलेश चौगुले, राजेंद्र शिरगावे, शीतल पाटील (बंडू), अभिजीत पाटील, यांच्यासह प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केके न्यूजसाठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे



