Home Uncategorized शिरटीतील स्वाभिमानी दहीहंडी कुटवाडच्या नृसिंह गोविंदा पथकाने फोडली

शिरटीतील स्वाभिमानी दहीहंडी कुटवाडच्या नृसिंह गोविंदा पथकाने फोडली

4 second read
0
0
204

शिरोळ : कुणाल कांबळे

शिरटी (ता. शिरोळ) येथे वंदे मातरम कला क्रीडा व व्यायाम मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेली मानाची स्वाभिमानी दहीहंडी कुटवाडच्या नृसिंह गोविंदा पथकाने फोडली. नृसिंह गोविंदा पथकाने सलग तिसऱ्यांदा ही दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच या पथकाने चित्तथरारक आठ मानवी मनोरे रचून सलामी दिल्याबद्दल गावच्यावतीने या पथकाचा सन्मान करण्यात आला.उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नृसिंह गोविंदा पथकास पारितोषिक वितरण करण्यात आले. माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी यांनी स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. श्री स्वामी समर्थ महिला सहकारी सूतगिरणीच्या संचालिका सौ. रूपाली सुहास राजमाने यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करून सोहळ्याची सुरवात करण्यात आली.

नृसिंह गोविंदा पथकाने सलामी दिली. यानंतर जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीमधील विद्यार्थी, व विद्यार्थ्यांनींनी कराटे आणि लाठी-काठीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. नृसिंह गोविंदा पथकाने सात थर लावून मानाची स्वाभिमानी दहीहंडी फोडली. दहीहंडी फोडणारा गोविंदा आणि पथकास संयोजकांकडून १५ हजार रुपये आणि डॉ.धर्मपाल पाटील व डॉ.रूपाली पाटील यांच्यावतीने ५ हजार रुपये व कायम चषक असे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. युवा कार्यकर्ते संदीप रोजे, महावीर बागे, संकेत पाटील, प्रज्वल पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे प्रमुख सौरभ शेट्टी, स्वाभिमानी युवा आघाडी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, डॉ. धर्मपाल पाटील,भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद उर्फ बाळासो गावडे, जयसिंपुरचे माजी नगरसेवक बजरंग खामकर, सरपंच शुभांगी शिरगावे, उपसरपंच प्रकाश माळी, शिरटी सोसायटीच्या चेअरमन सौ. संगीता भोसले, माजी सरपंच सौ. अनिता चौगुले, सौ.हसीना मुलानी, ग्रामपंचायत सदस्य रामदास भंडारे, सागर पवार सौ. सोनाली हूवन्नावर, सामाजिक कार्यकर्ते सतीश चौगुले, निलेश चौगुले, प्रसिद्ध उद्योजक विनोद मगदूम, राजकुमार शिरगावे, प्रकाश उदगावे, डॉ. सतीश चौगुले, दत्तात्रेय भादरगे, सुरज मुल्लानी, अमोल सुतार, सुरेश बंडगर, बाहुबली पाटील अशोक चौगुले, आलम मुल्लानी, सुनील माळी, यांच्यासह वंदे मातरम मंडळ आणि गावातील सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…