
शिरोळ : प्रतिनिधी
येथील ग्रामपंचायतीने नेहमीच विकासाच्या विविध योजना राबवल्या आहेत. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम गावामध्ये राबवले जातात. गावातील कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये यासाठी गावचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी यांनी केले. ते शिरटी ता. शिरोळ येथील विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना राहुल सूर्यवंशी म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांकडे आमचे विशेष लक्ष असून चांगल्या दर्जाच्या सुविधा, संधी विद्यार्थांना उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवण्यासाठी सर्व समाजघटकांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या कुमार व कन्या विद्या मंदिर येथे मुला – मुलींसाठी कराटे क्लासेस, दांडपट्टा यासारखे उपक्रम शिकवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरटी येथील महावीर नगरमधील जैन बस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरमीकरण करणे, महावीर नगर येथील पाण्याच्या टाकीभोवती संरक्षण भिंत बांधणे, शांतीसागर येथील प्राथमिक शाळेभोवती संरक्षण भिंत बांधणे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची सुधारणा करणे, पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्राचे रंगरंगोटी करणे, मुस्लिम वस्ती येथे वाढीव पाईपलाईन करणे, माळी वस्ती येथे गटर्स बांधणे, शौचालय बांधणे, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सोलर बसवणे, पाण्याच्या टँकरची दुरुस्ती अशा एकूण २२ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी सरपंच शुभांगी शिरगावे, उपसरपंच प्रकाश माळी, राजकुमार शिरगावे, सुनील माळी, खानगोंडा पाटील, आलम मुलानी, राजकुमार शिरगावे, धनाजी भोसले, जितेंद्र कांबळे, अरुण भंडारे, मनेश ममदापूरे, सुभाष मगदूम, अनिल रोजे, संदीप चौगुले, अमित शिरगावे, बापू चौगुले, भास्कर चौगुले, सागर कोगनोळे, बंडू दानोळे ,रामचंद्र कोगनोळे, सुनील मगदूम सुभाष गतारे, संजय माळी, गोटू गतारे, शांतिनाथ चौगुले, अशोक गतारे, रविराज पाटील, निखिल पाटील, संकल्प निडोणे, सुनील पाटील, जयपाल कोगनोळे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


