
कागल तालुका प्रतिनिधी ओंकार पोतदार
मुरगूड सुरू असलेल्या लाल आखाडा चषक मॅटवरील राज्यस्तरीय भव्य कुस्ती स्पर्धेत दुसऱ्या दिवशी शनिवारी सर्वच गटातील तब्बल ३५० कुस्त्या अटीतटीच्या झाल्या. लहान मल्लांच्या वेगवान कुस्तीनी शौकिनांच्या डोळ्यांचे पारडे फेडले. खुल्या गटात पहिल्या, दुसऱ्या फेरीतील सर्वच लढती काटाजोड झाल्या. या गटातून पिंपळगावचा सध्या पुण्यामध्ये सराव करणारा शिवछत्रपती पुरस्कार विजेता कौतुक डाफळे, साई आखाड्याचा निढोरी गावच मल्ल रोहन रंडे आणि पुण्याचा रोहित खेडकर यांच्यासह पंचवीस मल्लांनी पुढील फेरीत प्रवेश केला.कुस्ती स्पर्धेच्या प्रारंभी शहरातील सर्व माजी सैनिक, कुस्ती साठी योगदान दिलेल्या सुमारे दोनशे माजी पैलवानांचा
तसेच मुरगूड नगरपालिकेचा स्वच्छतेच्या बाबतीत देशात चौथा क्रमांक आल्यामुळे मुरगूड नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी तसेच.मर्चंट नेव्ही चीफ ऑफिसर हणमंत पाटील राष्ट्रपती पदक
विजेते भारत तांबेकर, आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर स्वाती शिंदे, नंदिनी साळोखे, नेहा चौगले यांचा सन्मानचिन्ह देऊन गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात यावेळी पद्मसिंह पाटील, विश्वजीत पाटील, संतोषकुमार वंडकर, दत्तामामा जाधव,बजरंग सोनुले, आदी प्रमुख उपस्थित होते
विविध गटातील विजेते मल्ल पुढीलप्रमाणे
खुल्या गटातील विजयी मल्ल:-
प्रशांत जगताप इचलकरंजी, अजय थोरात शाहूपुरी, विशाल जाधव, शाहूपुरी, विजय डोईफोडे सातारा, ऋतुराज शेटके वडकशिवाले, शिरोली, सत्यजित जोंधळेकर शाहूपुरी, सिद्राम धायगुडे शाहूपुरी, रोहित खेडेकर पुणे, रोहन रंडे निढोरी, अनिल चव्हाण नंदगाव ऋषिकेश पाटील बानगे ,सचिन मुळे गंगावेश,मुळे गंगावेश बाबासाहेब रानगे आरे, शामसुंदर यादव राशिवडे, रितेश नवणे पुणे,पाडुरंग शिंदे सांगली.
२५ किलो विजय मल्ल :- आदित्य पाटील गंगापूर, कौतुक किल्लेदार गंगापूर, रुद्राक्ष तळेकर केनवडे,शिवरुद्र चौगुले एकोडी
३० किलो विजयी मल्लः- पृथ्वीराज मोहिते कोगील, सोहम पाटील नादवडे, हर्षद जाधव सरवडे, रितेश मगदूम बानगे, चौकार बानुगडे राशिवडे
४२ किलो विजय मल्ल:-
राज जमिनीक बानगे, श्रीधर मगदूम बुधिहाळ, हर्षवर्धन माळी म्हाकवे, पृथ्वीराज मगदूम सिद्धनिर्ली, प्रथमेश पाटील बानगे.
३५ किलो विजय मल्ल :
पृथ्वीराज शिनगारे तळदगे, राजवर्धन पाटील नावळी,, रुद्र कुंभार शिरोली,युवराज कामन्ना पट्टणकोडोली
५२ किलो विजयी मल्ल:-
मंगेश डाफळे निळपण, सुहास पाटील शिरोल, अजित कुत्रेंकन कंदलगाव, विवेक पाटील खटांगळे, विश्वजीत गिरिबुवा हुपरी
रात्री उशिरापर्यंत विविध गटातील कुस्ती कुस्ती सावकीरांच्या आवड गर्दीमध्ये सुरू होत्या. रविवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेची अंतिम लढत होणार असून या लढती करे सर्व कुस्ती शौकिनांचे लक्ष लागून राहिले आहे.
