Home Uncategorized पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

5 second read
0
0
65

राज्याच्या निती आयोग व मित्रा संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर – सांगली जिल्ह्यासाठी एमआरडीपी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये असे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज दिले.
कोल्हापूर,सांगली व इचलकरंजी शहराला संभाव्य पूरस्थितीचा अधिक फटका बसतो हा फटका बसू नये आणि यदाकदाचित तो बसलाच तर त्याची तीव्रता कमी असावी या उद्देशाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूर नियंत्रण (MRDP – महाराष्ट्र रिझलंन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम ) प्रकल्प आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी कोल्हापूर मनपा आयुक्त के.मंजूलक्ष्मी सांगली मनपा आयुक्त सत्यम गांधी,अतिरिक्त आयुक्त (मनपा) रविकांत आडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव प्रामुख्याने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले,संबंधित जिल्ह्यात नदीच्या पुराचे पाणी शहरात येऊ नये यासाठी जलसंपदा विभागाने सांगली इचलकरंजी व कोल्हापूर शहराशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात यासाठी आवश्यक तो निधी मित्रा संस्थेमार्फत देण्यात येईल.उल्लेखित शहरांच्या ठिकाणी जास्त लांबीचे जे नाले आहेत . या नाल्याच्या सभोवतालचा परिसर कसा विकसीत करता येईल त्याचबरोबर या ठिकाणी विरंगुळा केंद्राची कशी उभारणी करता येईल याबाबतचा विचार या प्रकल्पामध्ये करावा. तसेच शहरातील मुख्य नद्यांच्या सुधारणेसह दुय्यम व तृतीय स्तरावरील नाले यांचाही विचार पूर नियंत्रणासाठी करावा अशी सूचनाही त्यांनी केली .
प्रारंभी क्षीरसागर यांनी सांगली,इचलकरंजी व कोल्हापूर शहरातील किती नाले पूरबाधित आहेत याचा सविस्तर आढावा संबंधित अधिकाऱ्याकडून जाणून घेतला.यावेळी वरील शहरातील नागरी वस्तीमध्ये किती नाल्यांमुळे मानवी जीवन प्रभावीत होते याचे PPT द्वारे सादरीकरण करण्यात आले. नगरविकास, जलसंपदा व आपत्ती विभागाच्या समन्वयातून हा प्रकल्प आगामी 2 ते 3 वर्षात कार्यान्वित होईल असा आशावादही या बैठकीत व्यक्त करण्यात आला .
याप्रसंगी मित्राचे तांत्रिक संचालक विनय कुलकर्णी,पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे,कार्यकारी अभियंता स्मिता माने मनपा जल अभियंता हर्षजित घाटगे,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह सांगली,कोल्हापूर,इचलकरंजी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…