Home Uncategorized मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

5 second read
0
0
49

जयसिंगपूर : प्रतिनिधी
सर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली आहे. कोल्हापूर येथे सुरू झालेली फिल्म सिटी आजही टिकून आहे. आणि भविष्यातही टिकणार आहे. यामुळे फिल्मसाठी व मराठीसाठी मी काहीही करण्यासाठी आपण तयार आहोत. शिवाय सुनील शेट्टीही आज महाराष्ट्रामुळेच आहे. त्यामुळे प्रत्येकाने मराठी भाषा बोलली पाहिजे आणि मराठी शिकलेच पाहिजे. कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा व मटणाच्या चवीला कोठेही तोड नाही. तसेच मी कोल्हापूरला कधीही विसरू शकणार नाही असे प्रतिपादन अभिनेते सुनील शेट्टी यांनी केले.

जयसिंगपूर येथील सहकारमहर्षी शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी स्व. मोतिलाल चोरडिया चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ट्रेड सिटी जयसिंगपूर यांच्यावतीने जयसिंगपूर भूषण पुरस्कार महेंद्र सावंत यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मानपत्र, स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आला. यावेळी सुजाता सावंत, रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरूण भंडारे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रारंभी स्वागत रोटरीचे अध्यक्ष डॉ.अतिक पटेल यांनी केले. उद्योजक विनोद चोरडिया यांनी ट्रस्ट व रोटरीच्या कार्याचा आढावा विषद केला. पुरस्काराचे मानपत्र वाचन डॉ. पटेल यांनी केले.

पुरस्काराला उत्तर देताना महेंद्र सावंत म्हणाले, जयसिंगपूरकरांचे प्रेम आणि निस्वार्थीपणाने केलेले काम सर्वांच्या लक्षात आले आहे. आजचा सन्मान हा समस्त जयसिंगपूरकरांचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.

अभिनेत्री अलका कुबल म्हणाल्या, खरा माणूस खरा हिरो असतो. सुनील शेट्टी हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. चोरडिया ट्रस्टचे काम उल्लेखनीय आहे. आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात. जोडणं आणि जोडून ठेवणं हा आयुष्याचा मेळ असतो. ते काम महेंद्र सावंत यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गिरीश कुलकर्णी, नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, उद्योजक संजय घोडावत, माजी अप्पर पोलीस महासंचालक भगवंतराव मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, उद्योजक विनोद घोडावत, राजेश चोरडिया, प्रमोद चोरडिया, प्रकाश झेले, वसुंधरा कोले, मिलिंद शिंदे, राजेंद्र नांद्रेकर, राजू झेले, डॉ.दगडू माने, सागर आडगाणे, रमेश यळगुळकर यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…