Home Uncategorized मुरगूड येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांना प्रारंभ

मुरगूड येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांना प्रारंभ

2 second read
0
0
96

कागल तालुका प्रतिनिधी ओंकार पोतदार

मुरगूड येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांना प्रारंभ कागल तालुका प्रतिनिधी ओंकार पोतदार कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय – तालीम संघाच्या मान्यतेने लाल आखाडा व्यायाम मंडळ मुरगूड यांच्या वतीने गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजितसिंह वि. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय मॅटवरील लाल आखाडा चषक भव्य कुस्ती स्पर्धेचा उत्साहात प्रारंभ झाला .विविध वजनी गटांत ४९० मल्लांनी सहभाग घेतला असून यामध्ये खुल्या गटात राज्यभरातून ५५ मल्ल सहभागी झाले असून यामध्ये राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या मल्लाचा तसेच महाराष्ट्र केसरी साठी खेळलेल्या 38 मल्लांचा देखील यामध्ये समावेश आहे समावेश आहे.

तब्बल 55 मल्ल लाल आखाडा चषकासाठी लढणार आहेत. या स्पर्धांचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके यांच्या हस्ते तर ‘बिद्री’चे संचालक बाबासो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. वजन काट्याचे पूजन सखाराम डेळेकर, मोहन गुजर, बजरंग सोनुले,एकनाथ बरकाळे, अशोक खंडागळे, बाजीराव चांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले दीपप्रज्वल गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे, प्रतिमापूजन ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष सुनीलराज सूर्यवंशी व ध्वजारोहण गोकुळचे संचालक पंडितराव केणे तर मॅट चे पूजन बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भीमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांचा कारखान्याचे चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल रणजीतसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आज झालेल्या कुस्तींमध्ये पै.अक्षय साळवी बानगे, पै. प्रशांत मांगोरे पिंपळगाव, पै. कुलदीप पाटील राशिवडे, पै.रणजीत भारमल मुरगुड, पै. अमोल बोंगाडे बानगे, पै.सुदर्शन पाटील पै. हर्षद रावळे, पै. युवराज कामांना, पै.रितेश मगदूम,पै.ओम पवार, पै. सतेज मांगोरे, पै. अर्थव पाटील निगवे, पै. शौर्य पाटील यांनी विजय मिळवत पुढील प्रवेश केला रात्री उशिरापर्यंत कुस्त्या सुरू होत्या. मुरगुड आणि परिसरातील हजारो कुस्ती शौकिनांच्या गर्दीमध्ये रात्री उशिरापर्यंत कुस्त्या सुरू होत्या. रविवार पर्यंत या स्पर्धा रंगणार असून परिसरातील कुस्ती शौकिनांनी या स्पर्धांचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले. रविवारी या स्पर्धेतील फायनल कुस्त्या रंगणार असून या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुरगुड येथील राज्यस्तरीय लाल आखडा चषक स्पर्धेचे उद्घाटन करताना मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…