Home Uncategorized जय हनुमान तालीम मंडळाचा शिवजयंतीनिमित्त रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा जागर

जय हनुमान तालीम मंडळाचा शिवजयंतीनिमित्त रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा जागर

3 second read
0
0
50

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय हनुमान तालीम मंडळ, राधानगरी व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिबिरात युवकांसह विविध वयोगटातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदान केले. गरजू रुग्णांसाठी रक्ताची उपलब्धता व्हावी तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी डॉ. रणजीत सरावणे यांच्या सौजन्याने धनुर्वात प्रतिबंधक व मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

त्यामुळे उपस्थित नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शनाचा लाभ मिळाला.मंडळाचे अध्यक्ष संदीप चौगले यांनी सांगितले की, जय हनुमान तालीम मंडळ गेली पाच वर्षे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असून शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या उपक्रमातून सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत असून आरोग्याबाबत सकारात्मक संदेश दिला जात आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी तानाजी कुंभार, पांडुरंग तोडकर, दीपक फक्के, गणेश कुंभार, शैलेश कुंभार, शिवाजी फक्के, राजू कुंभार, प्रमोद हासुरे, दशरथ पाटील, सोमनाथ नवाळे, प्रीतम निल्ले आदी मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.केके न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…