Home Uncategorized आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून राहुल सूर्यवंशी यांनी निवडणूक लढवावी : सामान्य जनतेची मागणी

आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून राहुल सूर्यवंशी यांनी निवडणूक लढवावी : सामान्य जनतेची मागणी

3 second read
0
2
221

कोल्हापूर जिल्हा परिषद मतदार संघातील प्रभागनिहाय आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. त्यामुळे अनेक दिग्गज उमेदवारांच्या तयारीला वेग आला आहे. शिरोळ तालुक्यातील महत्वाचा मानला जाणारा आलास जिल्हा परिषद मतदार संघ हा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाला आहे. या मतदार संघातून जिल्हा परिषदेसाठी शिरटीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी यांनी निवडणूक लढवावी, मतदार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, अशी मागणी मतदारसंघातील जनतेतून होत आहे.

राहुल सूर्यवंशी हे एक सक्षम असे युवा नेतृत्व असून ते गेल्या २० वीस वर्षांहून अधिक काळ समाजकारण व राजकारणात सक्रिय आहेत. सन २०१५ पासून आजतागायत शिरटी ग्रामपंचायतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एकहाती सत्ता आहे. सूर्यवंशी यांनी सन २०१५ ते २०१९ या काळात शिरटी ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषवले आहे. तसेच २०२१ पासून ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. विविध सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो.

गावामध्ये त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विविध फंडातून विकासाच्या अनेक योजना राबविल्या आहेत. तसेच विविध आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, वयोवृद्ध नागरिकांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजना, यासह शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम त्यांनी नेहमी राबवले आहेत. गावातील विविध तरुण मंडळाना एकत्र करून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार त्यांचा भर असतो. त्यामुळे त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून जनतेच्या मनावर एक आगळावेगळा ठसा उमटविला आहे. त्यांचे हे कार्य विचारात घेऊन त्यांना आलास जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास ते संधीचे सोने करून सर्वसामान्य, गोरगरिब घटकांना न्याय देतील असा आशावाद मतदारांनी व्यक्त केला आहे.

शिरटी या गावची लोकसंख्या सुमारे ८ हजार असून ५ हजार मतदारससंख्या आहे. यापूर्वी शिरटी हे गाव शिरोळ जिल्हा परिषद मतदार संघात होते. त्यामुळे या गावातील उमेदवारांना जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवण्याची संधी मिळत होती. शिरटीतील काही मान्यवरांनी पंचायत समितीचे सभापती, सदस्यपद मिळवून मतदारसंघातील जनतेची चांगल्या प्रकारे सेवा केली आहे.

मात्र मागील पंचवार्षिक निवडणुकीपासून शिरटी हे गाव आलास जिल्हा परिषद मतदारसंघात जोडण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी या गावातील लोकांचा विचार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राजकीय पक्षाकडून तिकीट वाटपावेळी या गावाला विचारात घेतले नसल्याचे चित्र मागील वेळेस अनुभवायला मिळाले आहे. त्यामुळे ही बाब विचारत घेऊन यंदा शिरटी गावाला आलास जिल्हा परिषद मतदारसंघात नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशी मागणी सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…