Home Uncategorized धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

5 second read
0
0
14

प्रतिनिधी : रोहित पास्ते

मलकापूर येथील सुभाष रोड परिसरातील रहिवासी श्री. आनंदराव बंडू पाटील यांनी त्यांच्या घरासमोरील विद्युत डांब (इलेक्ट्रिकल पोल) पूर्णपणे खराब झाल्याने तो तातडीने बदलण्याची मागणी महावितरणकडे केली आहे.

oppo_0

याबाबत महावितरणच्या राज्य अभियंता कार्यालय, मलकापूर यांना निवेदन देण्यात आले असून, संबंधित डांब वाकलेला व धोकादायक स्थितीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

oppo_0

या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यास महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विद्युत डांब तात्काळ बदलण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

oppo_0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…