Home Uncategorized शाहुवाडी तालुक्यात अवकाळी पाऊस

शाहुवाडी तालुक्यात अवकाळी पाऊस

3 second read
0
2
263

शाहूवाडी तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाच्या पेरण्या खोळंबल्या असून शेतात पाणी साचले आहे. तालुक्यातील काही भागात रब्बी हंगामातील मागास राहिलेले मका, ज्वारी ,भाजीपाला ही पिके अवकाळी पावसाने कापणी केलेल्या शेतातील पिकात शेतातपाणी पाणी साचल्याने कुजू लागले आहेत. तर वाळवण घातलेल्या पिकांना कुंभ आलेली आहेत. तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झाली आहे तसेच अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने नदीपात्रात पाण्याची वाढ होत असल्याने शेतकऱ्यांची शेती पंप पाण्याखाली बुडले आहेत. या सर्व नुकसानीमुळे व खरिपाच्या पेरण्या न झाल्याने यावर्षीचा खरीप हंगाम वाया जातो की काय या चिंतेने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.

शाहूवाडी तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे झालेल्या नुकसान भरपाई साठी शासनाने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. तरी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.

के.के . न्युज साठी राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…