Home शेती शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा भीमा कृषी प्रदर्शनात सन्मान

शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा भीमा कृषी प्रदर्शनात सन्मान

3 second read
0
0
1,416

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विकसित भारत संकल्पनेमुळे २०४७ पर्यंत होणार क्रांती – खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर/प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विकसित भारत संकल्पनेमुळे देशातील शेतकरी प्रगती पथावर आहे त्यातून शेतीत वेगवेगळे प्रयोग करणे व आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे त्यातून २०४७ साला पर्यंत कृषी क्षेत्रातील स्वावलंबी आणि आत्म निर्भर भारताचे स्वप्न साकार होईल असे उदगार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले.

भीमा कृषी प्रदर्शनात आयोजित आदर्श शेती भूषण व आदर्श जिजामाता पुरस्कार सह शेती क्षेत्रात उलेखणीय कार्य केलेल्या व पिके घेतलेल्या शेतकऱ्यांचा पुरस्कार व बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी आता ड्रोनचा वापर करून शेती करता येते पाणी दोन तासात शेतीला एकरी करता येते. जमिनीची वाटणी झाल्याने उत्पन्न कमी होत चालले आहे त्यामुळे जमिनीत वेगवेगळे प्रयोग करून आंतरपीके घेतली गेली पाहिजेत असे सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग केले आहेत त्याचा प्रसार त्यांनी करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी केवळ ५४ टक्के शेतकरी हे शेतीपूरक व्यवसायावर आधारित आहेत सकल उत्पादनात केवळ १६ टक्केच शेतकरी उरला आहे. शेतकऱ्यांना योग्य दिशा दाखवून आर्थिक विकासाची कास धरण्याकडे वळविणे आवश्यक असल्याचे सांगून आता शेती व्यवसाय आधुनिक शेती व्यवसाय झाला असून रेशीम व मधमाशी उद्योग करण्याकडे शेतकऱ्यांनी वळावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा असे सांगून मराठा वाड्यातील शेतकरी जादा उत्पन्न शेतीतून मिळवत आहे. त्यामुळे येणारा काळ सोपा नसल्याने शेतकऱ्यांनी सावध होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी कोल्हापूर जिल्हा कृषी पंढरी म्हणून ओळखला जातो याठिकाणी शेतकरी चौकस आहे नवनवीन तंत्र तो आत्मसात करत आहे.मात्र विदर्भ आणि मराठ वाड्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत हा मोठा चिंतेची बाब आहे असे सांगितले. त्यामुळे अशा कृषी प्रदर्शनाची माहिती आत्मसात करून शेती करावी असे आवाहन केले. यावेळी बोलताना माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी आपण व आपले वडील प्रगत शिल शेतकरी कसे बनलो याची माहिती सांगून पुण्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील उत्कृष्ठ भीमा कृषी प्रदर्शन असल्याचे सांगून याठिकाणी लाखो शेतकरी भेट देऊन माहिती घ्यावी असे आवाहन केले.

प्रास्ताविक विश्वराज महाडिक यांनी केले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार अमल महाडिक, श्री शाहू ग्रुप चेअरमन राजे समरजीत घाटगे, महाराष्ट्र राज्य भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ.शौमीका महाडिक, भागीरथी महिला अध्यक्षा सौ.अरुंधती महाडिक, भाजप सरचिटणीस महेश जाधव, भाजप पदाधिकारी हिंदूराव शेळके ए. वाय.पाटील, रिलायन्स पॉलीमर्सचे सत्याजित भोसले जिल्हा कृषी अधीक्षक अरुण भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

कृषी प्रदर्शनात दिले गेलेले पुरस्कार :

जिजामाता शेतीभूषण पुरस्कार जैविक व सेंद्रिय खते वापरून फळझाडे,भाजीपाला लागवड केलेल्या सौ.गंगूबाई आनंदा आढाव आणि कमी खर्चात जमिनीची सुपीकता करून आंबा आणि फळझाडे लागवड केल्याबद्दल सौ. रूपाली दत्तात्रय शेळके यांना देण्यात आला.

भीमा शेतिभूषण पुरस्कार (पुरुष)कलगोंडा मलगोंडा टेळे,धनाजी बाळू कंदले, विठ्ठल दगडु पाटील,विश्वजित बाजीराव साळोखे,, युवराज विठ्ठल कुंभार

भीमा आदर्श शेतकरी पुरस्कार गणपती पांडुरंग सोनार, सुधीर शिवाजी कुरळे, धण्यकुमार सुभाष पाटील, उत्तम कुंडलिक पाटील, उमेश आनंदराव सुर्वे, सौ.उर्मिला आनंदराव पाटील, सौ.विमल लक्ष्मण चौगुले, तुकाराम केरबा वाळवेकर,अशोक धनपाल पाटील.

आदर्श कृषी विस्तारक पुरस्कार डॉ. रतन रंगनाथ कराड, डॉ.योगेश गंगाधर बन, संजय आण्णासो सुतार, प्रदीप गुंडा गावडे, तेजस भिवा खाडे, बाळासाहेब विष्णू आजगेकर.

भीमा कृषी संशोधक डॉ. सात्ताप्पा भांबर खरबडे, डॉ. प्रवीण नामदेव गजभिये, डॉ.विजय नामदेव नाळे.

आदर्श पशुवैद्यक पुरस्कार डॉ.संम लूद्रिक (पशुधन विकास अधिकारी) डॉ. एन. डी. पवार पशुधन विकास अधिकारी, डॉ. सचिन राजाराम पाटील पशुवैद्यकीय अधिकारी,डॉ. प्रमोद मधुकर खोपडे(पशुवैद्यकीय अधिकारी), डॉ.विनायक मारुती पाटील (पशुवैद्यकीय अधिकारी,)दिलीप शंकर बारड (पशुवैद्यकीय अधिकारी),श्री रणजित वसंत पाटील (गुणवंत जिल्हा परिषद कर्मचारी पुरस्कार).

पीक स्पर्धा पिके निकाल अमोल बळवंत पाटील यांचा ऊस ८६०३२ (प्रथम क्रमांक)राजेंद्र पांडुरंग हुजरे यांची ज्वारी कोड ८३ सुचित्रा (द्वितीय)प्रदीप वसंत रोकडे यांचा गहू (तिसरा क्रमांक)

पीक स्पर्धा फुले निकाल सौ.मोनिका सुदर्शन बिरनाळे (दानोळी निशिगंध प्रथम क्रमांक)श्री.बाळासाहेब चौगुले (शिरोळ कर्णेशियम द्वितीय क्रमांक)राजेंद्र बळवंत मोरे (पोर्ले गुलाब तृतीय क्रमांक)

पीक स्पर्धा फळे निकाल नारायण राजाराम पांडव (खुपिरे देशी केळी प्रथम क्रमांक)पुंडलिक कृष्णा डाफळे (हणबरवाडी पपई द्वीतीय क्रमांक)संदीप सर्जेराव पाटील (जाफळे चिकू तृतीय क्रमांक)अनिल सयाजी बच्चे (सावर्डे स्ट्रॉबेरी तृतीय क्रमांक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…